साताऱ्यात वकिलांचे कामबंद आंदोलन

 

सातारा,दि.25 (प्रतिनिधी)

सातारा,कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीसाठी सातारा जिल्हयांतील वकिलांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व वकिलांनी पाठींबा दिल्याने न्यायालयात सर्वत्र बऱ्यापैकी शुकशुकाट होता.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील वकिलांचा गेली पस्तीस वर्षे न्यायमार्गाने संघर्ष सुरू आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती काहीच सकारात्मक न आल्याने वकिलांनी जिल्ह्यात कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

साताऱ्यातील या आंदोलनाला बार असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश जाधव, उपाध्यक्ष रफिक शेख, सचिव रविंद्र क्षीरसागर, सहसचिव जयश्री तिरोडकर, खजिनदार चंद्रकांत रेडेकर, शरद जांभळे, मन्मथ आठल्ये, स्वाती जाधव, सागर शेडगे यांच्यासह सर्व वकिल बांधवांनी मोठ्या संख्येने कामबंद आंदोलनात सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)