साताऱ्यात लेदर बॉल क्रिकेटची परंपरा कायम

 जिल्हा परिषदेच्या मैदानावर लेदर क्रिकेटचा आंनद लुटताना महाविद्यालयीन खेळाडू ...ं(छाया: सम्राट गायकवाड )

जिल्हा परिषद मैदानावर रंगतायत सामने
सातारा,दि.24 ं(प्रतिनिधी)- लेदर बॉल क्रिकेट श्रीमंतांचा खेळ समजला जात असला तरी लेदर बॉल क्रिकेटची परंपरा साताऱ्यात अद्याप कायम आहे. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सध्या महाविद्यालयीन तसेच खासगी क्रिकेट कल्ब अंतर्गत सामने रंगतदार होत आहेत. तर सातारकर प्रेक्षक ही सामन्यांचा पुरेपर आनंद घेताना दिसून येत आहेत.
रणजी व आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या माध्यमातून यापुर्वी खेळाडूंना करिअर घडविण्याची संधी उपलब्ध होत असायची. मात्र, मागील काही वर्षापुर्वी आयपीएल सारख्या खासगी टुर्नामेंटच्या माध्यमातून ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील देखील खेळाडूंना संधी मिळू लागली आणि त्याचबरोबर आर्थिक व सामजिक प्रतिष्ठा देखील मिळू लागली. त्यामुळे आपसुकच खेळाडूंचा लेदर क्रिकेटकेडे ओढा वाढताना दिसून येत आहे. परिणामी महाविद्यालयाअंतर्गत लेदर बॉल क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन साताऱ्यातील मैदानांवर होत आहे. मात्र, साताऱ्यात अद्याप ही लेदर क्रिकेटच्या वाढीसाठी सर्व सुविधायुक्त मैदाने उपलब्ध नाहीत. त्याच बरोबर क्रिकेटचे बदलते स्वरूप पाहता प्रशिक्षण देखील मिळत नसल्याची खंत विद्यालयिन खेळाडू व्यक्त करित आहेत.

चौकट: बारामतीप्रमाणे साताऱ्यात हवे मैदान
बारामती नगरपालिकेने मागील वर्षी राष्ट्रीय दर्जाचे मैदान व स्टेडियम उभारले असून त्याचे उद्घाटन सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे ठीकाण असलेल्या साताऱ्यात देखील किमान राष्ट्रीय दजाचे मैदानाची निर्मिती केल्यास खऱ्या अर्थाने लेदर क्रिकेटची पंरपरा वाढीस लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)