साताऱ्यात युवतीचा विनयभंग

सातारा,दि.5(प्रतिनिधी) – तू मला आवडतेस,माझ्या सोबत चल म्हणत युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिडीतेने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.लक्ष्मण राजू जाधव (रा. लक्ष्मीटेकडी,सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

दि. 3 ते 4 जानेवारी या दरम्यान संशयीताने पिडीतेला वेळोवेळी रस्त्यावर आडवले. त्यावेळी तू मला आवडतेस, मी तुझ्यावर खुप वर्षापासून प्रेम करतो. तू जर माझी झाली नाहीस,तर मी कुणाचीच होऊ देणार नाही. असे म्हणत त्याने पिडीतेला जवळ ओढुन घेतले. त्यानंतर, मी तुला अडवुन ठेवले याची माहिती कोणाला दिली तर, तुला जिवंत ठेवणार नाही. अशी धमकी दिली. पुढील तपास सातारा शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उनिरीक्षक विजया वंजारी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)