साताऱ्यात युवतीचा विनयभंग

सातारा- सातारा शहरातील एका महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली.याप्रकरणी भुईंज येथील युवकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अभीजित प्रमोद जाधव (रा.भुईंज ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

पिडीत युवती आणि आरोपी हे एकाच महाविद्यालयात शिकत आहेत. संशीत पिडीतेचा वेळोवेळी पाठलाग करत होता. दि. 3 रोजी त्याने महामार्गाजवळील सर्व्हिस रोडवर पिडीतेचा हात धरून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिने तक्रार दिली आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अर्चना दयाल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)