साताऱ्यात युवतीचा विनयभंग

सातारा,दि.29 (प्रतिनिधी) – सातारा शहरातील एका उपनगरात युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात आसनगावच्या युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. उमेश नथू निकम (वय 34) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका सतरा वर्षीय युवतीने तक्रार दिली आहे.
ही युवती मैत्रीणीसोबत शाळेतून घरी निघाली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या उमेश निकम याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास शाहूपुरी पोलिस तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)