साताऱ्यात मोगलाई नाही, खा. उदयनराजेंचा जांभळेंना इशारा

सातारा -भाजप नगरसेवक धंनजय जांभळे यांनी खड्डे आणि पाणी या प्रश्‍नावरून पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दांडक्‍याने फोकळून काढू असा दमच भरल्यानंतर पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेवून तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. साताऱ्यात काय मोगलाई लागून गेली नाही असा इशारा देत कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या जांभळेवर गुन्हा दाखल करा अशा सुचना मुख्याधिकारी शंकर गोरेंना दिल्या.

सकाळपासून घडलेल्या नाट्यांनतर खा. उदयनराजे भोसले यांनी पालिकेत येवून कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ते म्हणाले, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे, साताऱ्यात काय मोगलाई लागून गेली नाही. दादागिरी करायला अक्कल लागत नाही. माझ्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, माझी संहनशिलता संपली तर मी काय करेन देव जाणे. जांभळे याचे पहिले रिव्हॉल्वरचा परवाना रद्द करण्याची मागणी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी. आज कर्मचाऱ्यांना दम दिला. उद्या हा गोळ्या घालण्याची भाषा करेल. कर्मचाऱ्यांवर सभागृहात दादागिरीची भाषा करणाऱ्या त्या नगरसेवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सुचना यावेळी मुख्याधिकारी गोरे व सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)