सातारा – अन्न आणि औषध प्रशासनाच्या आधिकाऱ्यांनी मुख्य बसस्थानकासमोरील एका स्वीट मार्टच्या दुकानावर छापा मारून 8 हजार 469 रुपये किंमतीचा 169 किलो खवा जप्त केला. या दुकानातून खवा व बर्फीचे दोन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

सणासुदीच्या दिवसांमुळे खवा, मावा, मिठाई आदी पदार्थांचे जास्त सेवल होते. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मिठाई उत्पादक व विक्रेत्यांची तपासणी करण्यात येत आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त एस. बी. कोटगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी आर.ए. खापणे, आर.आर. शहा, वाय. टी. ढेंबरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)