साताऱ्यात महिला पोलिसाचा विनयभंग

पाठलाग केल्याची तक्रार;दिलीप मानेवर गुन्हा
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी)
सातारा शहरातील एका महिला पोलिसाचा पाठलाग करून विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी दिलीप माने (रा. शनि मंदीराजवळ , सातारा) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील या 25 वर्षीय महिला पोलिसाचा पोलीस वसाहत, सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल तसेच राजवाडा परिसरात दिलीप माने हा पाठलाग करत होता. त्याचबरोबर सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोरील हॉटेलमध्ये त्याने जाणूनबुजून हात व पायाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच तिला फोन करून , आपण पुण्याला फिरायला जाऊया असे म्हणत होता. आपण फिरायला जाणार आहे हे कोणाला सांगू नकोस असे म्हणत तिचा विनयभंग केला.याप्रकरणी त्या महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दाखल तक्ररीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)