साताऱ्यात बनावट नोटा छापणारी टोळी जेरबंद

56 लाख 42 हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात 

सातारा : सातारा शहरातील कोटेश्‍वर मंदीर परिसरात दोन हाजाराच्या व पाचशे रूपयाच्या बनावट नोटा स्वत: छापून मोटारसायकलवरून विकणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 56 लाख 42 हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी सातारा शहरातील असल्याने बनावट नोटांचे कनेक्‍शन किती खोलवर आहे याचा तपास करण्याचे आव्हान सातारा पोलिसांच्या पुढे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनिकेत प्रमोद यादव (रा. नविन एमआयडीसी, सातारा) व अमोल अर्जुन शिंदे (रा. गडकर आळी, सातारा) हे दोघे कोटेश्‍वर मंदीर परिसरात बनावट नोटा बाजारात चालवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पो. नि. पद्माकर घनवट यांना मिळाली होती त्यानुसार स.पो.नि. विकास जाधव यांच्या पथकाला कारावाईच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या आरोपींच्याकडे 26 लाख 54 हाजर पाचशे रुपयाच्या बनावट नोटा छापलेल्या तर 29 लाख 88 हजार रुपयाच्या अर्धवट छापलेल्या नोटा अशा एकूण 56 लाख 42 हजार पाचशे रुपयांच्या नोटा मिळाल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी मुख्य सुत्रधार गणेश भोंडवे रा. मोळाचा ओढा, अमोल शिंदे रा. गडकर आळी, सातारा, अनिकेत यादव रा. नविन एमआयडीसी सातारा, अमेय राजेंद्र बेलकर रा. मतकर कॉलनी सातारा, राहूल अर्जुन पवार रा. शाहूपुरी व अन्य एक असे सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींनी शुक्रवार पेठेत असलेल्या गणेश अर्पाटमेंट मध्ये नोटा छापल्याचे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)