साताऱ्यात फिटनेस टेस्ट ट्रॅक सुरू

वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ट्रॅकचे उद्घाटन करताना खा.उदयनराजे भोसले, शेजारी नगराध्यक्षा माधवी कदम व इतर मान्यवर

वाहनधारकांची कराडवारी थांबणार:
सातारा,दि.5 प्रतिनिधी- फिटनेस टेस्टसाठी वाहनधारकांना कराडला जाण्याची वारी आता थांबणार असून बुधवारी साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या फिटनेस टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ट्रॅकची सुरूवात करण्यात आली.
त्यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, टी.ऍण्ड टी.इन्फ्राचे चेअरमन श्रीमंत तांदुळकर, शिवराम थोरवे, अरूण देसाई, अनिल देसाई, वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश घाडगे, सुनिल काटकर आदी.उपस्थित होते.
ट्रॅक उभारणीसाठी सहकार्य लाभलेले टी.ऍण्ड टी.इन्फ्राचे चेअरमन श्रीमंत तांदुळकर यावेळी बोलताना म्हणाले, मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ट्रॅक उभारणीसाठी सहकार्य केले आहे. त्याचबरोबर आरटीओ बाबत वाहनधारकांमध्ये कायम भितीचे वातावरण असते ते दूर करण्यासाठी जागृती करणे आवश्‍यक आहे. नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, साताऱ्यात फिटनेस टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आल्यामुळे वाहनधारकांचा वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होणार आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी तत्परता दाखविल्यामुळे ट्रॅकचे काम तात्काळ होवू शकेल. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे म्हणाले, सन.2006 पासून ट्रॅक तयार करण्यात यावा यासाई सातत्याने प्रयत्न सुरू होते.मात्र, जागेचा प्रश्‍न निर्माण झाला होता परंतु आता वर्ये येथे जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी देखील ट्रॅक उभारण्यात येणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)