साताऱ्यात फक्त मीच चालतो डायलॉगला उदयनराजे कार्यकर्त्यांचा आक्षेप

फाईट चित्रपटाच्या प्रमोशनलाच फाईट

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) – राधिका हॉटेलमध्ये गुरुवारी आयोजित फाईट चित्रपटाच्या प्रमोशनलाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी फाईट दिली. साताऱ्यात फक्त मीच चालतो या डायलॉगला आक्षेप घेत निर्मात्याच्या गाडीची काच फोडण्यात आल्याने एकच गोंधळ झाला. फाईटची क्रू टीम व कार्यकर्ते यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. शाहुपुरी पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाल्याने तणाव निवळला . या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचे समजते मात्र या फोडाफोडी प्रकरणाची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती .
फाईट चित्रपटाचे प्रदर्शन येत्या 20 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्त येथील हॉटेल राधिका येथे प्रमोशनचे आयोजन करण्यात आले होते . दिग्दर्शक जिमी मोरे, निर्माते ललित ओसवाल , नायक जित मोरे, नायिका सायली जोशी यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर उदयनराजे यांचे समर्थक अचानक तेथे दाखल झाले. आणि साताऱ्यात फक्त मीच चालतो या संवादाला आक्षेप घेत इनोव्हा गाडीची पाठीमागची काच फोडली . चित्रपटातील संवादावरून वाद सुरू झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. चित्रपटातील तो संवाद काढून टाकण्यासाठी समर्थकांनी आग्रह धरला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येउन परिस्थिती नियंत्रणात ठेवली .तर त्याच चित्रपटातील तो संवाद ऐकून उदयनराजे मात्र अगदी मनमोकळेपणाने हसत होते. या प्रकाराचा खुलासा झाल्यावर मात्र त्यांनी कपाळावरच हात मारून घेतला .त्या चित्रपटातील संवादामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)