सातारा शहरातील गुलबहार पान टपरी फोडून सत्तावीस हजाराचा माल चोरट्यांनी लंप्पास केला.याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोवई नाक्‍यावरील हॉटेल गुलबहार शेजारी असणारे गुलबहार पान शॉप बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम साडे बारा हजार व पंधरा हजाराची वेगवेगळ्या कंपनीची सिगारेटवर डल्ला मारला.

हा चोरीचा प्रकार टपरी शेजारी असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)