साताऱ्यात पान टपरी फोडून 27 हजाराची चोरी

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) – सातारा शहरातील गुलबहार पान टपरी फोडून 27 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोवई नाक्‍यावरील हॉटेल गुलबहार शेजारी असणारे गुलबहार पान शॉप बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी दुकानातील रोख साडे बारा हजार व पंधरा हजारांची वेगवेगळ्या कंपनीच्या सिगारेटवर डल्ला मारला. हा चोरीचा प्रकार टपरीशेजारी असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)