साताऱ्यात धोकादायक इमारत कोसळली

सुदैवाने जिवीतहानी टळली
सातारा: येथील गोराराम परिसरातील धोकादायक इमारतीचा काही भाग रविवारी दुपारी कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी टळली असून संसारपयोगी साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ नगरपालिका व शाहुपुरी पोलीसांना दिली.परंतु घटना घडून तीन तास उलटूनही दोन्ही विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

प्रतापगंज पेठ, सातारा परिसरात गोरा राम मंदिरानजीक प्रसाद आगटे यांची राहिवासी इमारत असून ती मागील अनेक वर्षांपासून महेंद्र सुळके यांना भाडेस्वरूपात देण्यात आली होती. सन 1980 साली इमारतीचे बांधकाम झाले असल्याने इमारत धोकदायक झाली होती. त्याबाबतची माहिती प्रसाद आगटे यांनी पालिकेला दिली होती. त्यावर नगरपालिकेने दोन वेळा इमारत खाली करण्याची नोटीस महेंद्र सुळके यांना दिली होती.

मात्र, त्यानंतर ही सुळके यांनी इमारत खाली केली नव्हती. मागील काही महिन्यांपासून सततच्या पावसामुळे धोकादायक इमारतीचा भराव अखेर रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सूमारास कोसळला. त्यामध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील किचन व तळमजल्याचा समावेश असून सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी कोणी नसल्याने जिवीतहानी टळली. परंतु इमारत अचानक कोसळल्याने किचनमधील संसारपयोगी साहित्य ढिगाऱ्याच्या खाली गेल्याचे दिसून येत होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)