साताऱ्यात दोन घरफोड्या, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

सातारा – शहर व परिसरात रविवारी चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोड्यातून सुमारे 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. तामजाईनगर परिसरातून 5 हजार तर सदरबझार परिसरातून सुमारे 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे.

तामजाईनगरमधील सहयोग कॉलनीत सुहास एकनाथ मोरे (वय 40) यांच्या फ्लॅटचा कोयंडा रविवारी दुपारी तोडून 5 हजारांचा मुद्देमाल चोरीस झाला. सदरबझारमधील संतोष सदाशिव प्रभुणे (वय 53) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 3 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास झाला. यात 3 लाखांचे सोन्याचे दागिने चोरले. त्यामध्ये मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या, झुबे, रिंगा, वेढणी या दागिन्यांचा समावेश आहे. याचबरोबर 53 हजारांची रोकडही लांबवली. याप्रकरणी शाहुपूरी व सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)