साताऱ्यात तीन जुगार अड्ड्यावर छापा

चार लाखाचा मुद्देमाल जप्त

सातारा – सातारा शहरात सुरू असलेल्या तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तीन अड्ड्यावरील बारा जणांविरोधात कारवाई केली. या छप्यात पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम,दुचाकी असा चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. वृषभ तुळशीराम मोरे (रा. भोसलेवाडी,ता.सातारा) अनिल रामचंद्र कोळी (रा. झोपडपट्टी,सातारा) अक्षय अराम वाघमारे ,राजू भिमराव कैकाड (दोघे रा. रविवारपेठ, सातारा)लालसिंग सर्जेराव मोरे (रा. आंबेदरे,ता.सातारा) सुरेश रघुनाथ गाडे (रा. केसरकर पेठ,सातारा) शरद शामराव माने (रा.शाहूनगर,सातारा)मजूर सिंकदर बागावान (रा.गुरूवार पेठ,सातारा) संदीपदास तुलसीचरण दास (रा. एमआयडीसी,सातारा)प्रंशात भट (रा. यादोगोपाळ पेठ,सातारा) दत्ता जाधव (रा. शनिवार पेठ,सातारा) अबित बागवान (रा.सोमवार पेठ,सातारा) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा शहर पोलिसांनी पहिली कारवाई महामार्गाजवळ असलेल्या हॉटेल प्रितीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत जुगार साहित्य व रोख रक्‍कम असा एक हजार तीनशे रुपायाच्या मुद्देमालासह वृषभ तुळशीराम मोरे (रा. भोसलेवाडी,ता.सातारा) अनिल रामचंद्र कोळी (रा. झोपडपट्टी,सातारा) यांना ताब्यात घेतले. तसेच दुसरी कारवाई बस स्थानकाजवळ असलेल्या सेव्हन स्टार या इमारतीच्या आडोशाला जुगार घेताना अक्षय अराम वाघमारे ,राजू भिमराव कैकाड (दोघे रा. रविवारपेठ,सातारा)लालसिंग सर्जेराव मोरे (रा. आंबेदरे,ता.सातारा) यांना जुगाराचे साहित्य व रोख रक्कम तीन हजार आठशे वीस रुपयासह ताब्यात घेतले. तिसरी कारवाई राजलक्ष्मी टॉकीजजवळ केली. यात जुगाराचे साहित्य व रोख रक्‍कम एक लाख 34 हजारासह लालसिंग सर्जेराव मोरे (रा. आंबेदरे,ता.सातारा) सुरेश रघुनाथ गाडे (रा. केसरकर पेठ,सातारा) शरद शामराव माने (रा.शाहूनगर,सातारा)मजूर सिंकदर बागावान (रा.गुरूवार पेठ,सातारा) संदीपदास तुलसीचरण दास (रा. एमआयडीसी,सातारा)प्रंशात भट (रा. यादोगोपाळ पेठ,सातारा) दत्ता जाधव (रा. शनिवार पेठ,सातारा) अबित बागवान (रा.सोमवार पेठ,सातारा) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई सातारा शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)