साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा

File Photo

सातारा शहर ठाण्याजवळच मटका सुरू; एलसीबीने चौघांना अटक
सातारा-  सातारा शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एलसीबीने छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

शामसुंदर महादेव लोकरे (वय , रा.गोडोली), रामचंद्र भानु माने (वय , रा.मंगळवार पेठ), सुरज चंद्रकांत रोकडे (वय , रा.संभाजीनगर), सुरज भानुदास मोरे (रा.करंजे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना बेकायदा व्यवसाय बंद करण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळेच शनिवारी सायंकाळी उशीरा पोलिस मुख्यालयाशेजारी व सातारा शहर पोलिस ठाण्याच्या समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एलसीबीने छापा टाकला.

मल्हार पेठेतील व शहर पोलिस ठाण्याच्यासमोरील जुगार अड्‌ड्‌यावरील कारवाईत पोलिसांनी रोख 2 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)