साताऱ्यात चोरट्यांचा उच्छाद

दररोज एक तरी चोरीची घटना; पोलिसांच्यापुढे चोरट्यांचे मोठे आव्हान
सातारा : प्रतिनिधी
सातारा शहरात शाहूपुरी पोलिस ठाणे व सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज एक तरी चोरीची घटना घडत असल्याने शहर व उपनगरातील नागरिकांच्यात भितीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात चोरट्यांनी शहरात दोन ठिकाणी हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये रोख पन्नास हजार रुपयांच्या रकमेसह 21 हजार रुपयांचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. एका ठिकाणी घरफोडी तर दुसऱ्या ठिकाणी हॉटेलच्या पार्कींगमध्ये लावलेल्या पाठीमागील कारची काच फोडून लॅपटॉप, टॅब, 2 मोबाईल, प्रिंटरसह 21 हजारांचे साहित्य चोरी झाले आहे.
प्रकाश दिनकर पोतेकर (वय 45, रा. शेंद्रे ता. सातारा) यांनी रोख 50 हजार रुपयांची रक्कम चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.पोतेकर यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास सातारा शहर पोलिस करत आहेत.
तर पराग शिरीषकुमार सुभेदार (वय 34, रा. व्यंकटपुरा पेठ) यांनी कारची काच फोडून अज्ञातांनी साहित्य चोरी केल्याची तक्रार दिली आहे. दि. 29 रोजी रात्री साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत ते गोडोली येथील एका हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी हॉटेलच्या पार्कींगमध्ये कार पार्किंग केली असताना अज्ञाताने काचेवर दगड मारुन काच फोडत गाडीतील लॅपटॉप, टॅब, दोन मोबाईल व प्रिंटर असे 21 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. गाडीजवळ आल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत गुन्हा दाखल केला आहे.
सातारा शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज होत असलेल्या चोऱ्यांच्या सत्राने नागरिक भयभित झाले असल्याने पोलिसांनी रात्र गस्त व बिट मार्शल यांच्यात वाढ करण्याची मागणी होत आहे. शहरात झालेल्या अनेक चोऱ्यांच्या घटनापैकी काही घटनांचा तपास पोलिसांना अध्याप लावता आला नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)