साताऱ्यात चार गावठी पिस्तुलं जप्त

अडीच लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक
सातारा, दि. 21 (प्रतिनिधी) –
सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एकाचवेळी तब्बल चार
पिस्तूलं जप्त केली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. चार गावठी पिस्तूल, तीन जिवंत राऊंड, दोन मोबाइल असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये आठ पिस्तुले जप्त झाली त्यामुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा व्यापार चव्हाट्यावर आला आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची विक्रम जगताप, अजय खवळे, धनाजी मदने, शुभम शिंदे (सर्व रा. नेर व औंध ता. खटाव) अशी नावे आहेत. विक्रम जगताप याला स्थानिकक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडल्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल सापडले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याने आणखी तिघांना पिस्तूल विकल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी सर्व संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. संबंधित पिस्टल बिहार येथून आणल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, पो.नि. पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसने, पोलीस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, मधुकर गुरव, मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव माळी, अमोल जाधव, अनिल खटावकर, मारुती अडागळे, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)