साताऱ्यात घुमला जय श्रीरामाचा गजर

शिवसैनिकांनी केली महाआरती

सातारा,दि.24 प्रतिनिधी- अयोध्येत राम मंदिर झालेच पाहिजे मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेले असताना दुसऱ्या बाजूला उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सायंकाळी शिवसैनिकांनी महाआरतीचे आयोजन केले.

-Ads-

साताऱ्यातील भगवा राम मंदिरात सायंकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेना वरिष्ठ नेते अण्णा देशपांडे, नरेंद्र पाटील, शिरीष दिवाकर, हैबतराव नलवडे, बाळासाहेब शिंदे, निमिष शहा, महेश शिर्के, आतिष ननावरे, दत्तात्रय नलवडे, नितेश गादे यांच्यासह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, 6 डिसेंबर 1992 रोजी राम मंदिर होण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार लाखो शिवसैनिकांना अयोध्येकडे कूच केली. मात्र, त्यानंतर सरकारच्या धोरणामुळे अद्याप मंदिर होवू शकले नाही. परंतु त्यावेळी राम मंदिरासाठी दिलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बलिदानावर भाजपने तीन वेळा सत्ता काबिज केली. मात्र, केवळ निवडणूकांपुरते रामाचे नाव घेण्याचे काम भाजपकडून होत असल्याने आता आश्‍वासनांची आठवण करून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख अयोध्येत दाखल झाले असून आता पेहले राममंदिर, फीर सरकार अजेंडा शिवसेनेने हाती घेतला आहे आणि आता राममंदिर उभारणीसाठी शिवसैनिक जीवाचे रान करणार आहेत, असे ही पाटील यांनी सांगितले.

भाजप कार्यालयाशेजारी महाआरती
भाजपने निवडणूकीपुर्वी अयोध्येत राम मंदिर उभारणीचे दिलेल्या आश्‍वासनाची आठवण करून देण्यासाठी उध्दव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यात शिवसैनिकांनी प्रतापगंज पेठेतील भगवा राम मंदिरात महाआरतीचे आयोजन केले. मात्र, हे मंदिर भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाशेजारील असल्याने आपसुकच महाआरतीचा गजर त्या कार्यालयात पोहचल्याचे यावेळी दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)