साताऱ्यात ‘केसरी’ चित्रपटाचा सेट आगीत जळून भस्मसात

सातारा : साताऱ्यात सुपरस्टार अक्षयकुमारच्या ‘केसरी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सेटवर आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अक्षयकुमारसह सर्वजण सुखरुप आहेत.
साताऱ्यात पिंपोडे बुद्रुक गावामध्ये अक्षयकुमारच्या ‘केसरी’ सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. अक्षयकुमार ट्विटरवर आपले लूकही पोस्ट करत आहे. शूटिंग सुरु असताना मंगळवारी सिनेमाच्या सेटवर अचानक आग लागली. फटाके फोडण्याचे दृष्य चित्रीत केले जात असताना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्यापही दहा दिवसांचे शूटिंग बाकी होते.

आगीत बहुतांश सेट भस्मसात झाला असून शूटिंग काही काळासाठी थांबल्याची माहिती आहे. सेटची पुनर्निर्मिती करावी लागणार असल्यामुळे वेळ आणि पैशांचा खर्च वाढला आहे, त्यामुळेच निर्माते धास्तावले आहेत. काहीच दिवसांपूर्वी केसरी चित्रपटाच्या सेटवर एक स्टंट करत असताना अक्षयला दुखापत झाली होती. त्याच्या बरगडी आणि छातीला किरकोळ मार लागला होता. यानंतर अक्षयवर उपचारही करण्यात आले होते. डॉक्टरांनी अक्षयला विश्रांतीचा सल्ला दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)