साताऱ्यात एसटीच्या 1048 फेऱ्या रद्द

बसस्थानकात शुकशुकाट : सुमारे 18 लाखांचे नुकसान

सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा आगाराने आदल्या दिवशी रात्री बारापासूनच सर्व एसटी फेऱ्या रद्द केल्या. यामुळे बसस्थानकात शुकशुकाट होता. दिवसभरात जवळपास 1048 फेऱ्या रद्द झाल्यामुळे सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाले. गेल्या महिन्यात आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा आगार प्रशासनाने बसस्थानकाचे गेटच बंद केले होते.
मराठा क्रांती मोर्चाने दि. 9 ऑगस्टला महाराष्ट्रची हाक दिली होती. या पार्श्‍वभूमीवर सातारा आगाराच्या 1048 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे बसस्थानकात दिवसभर शुकशुकाट होता.
सर्व एसटी गाड्या बसस्थानकात उभ्या राहिल्यामुळे एसटी महामंडळाचे विसभरात 18 लाख रुपयांचे नुकसान झाले. सातारा आगाराबरोबरच जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगारांमध्ये दिवसभर एसटी गाड्या उभ्या होत्या. एसटी प्रशासनाने सर्व एसटी फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. खासगी गाड्या व वडापही बंद असल्याने प्रवाशांची गोची झाली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)