साताऱ्यातून तीन मुलींचे अपहरण

शहरात खळबळ; शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा – सातारा शहरातील एका उपनगरातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात अपहरणकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. एकाच दिवशी तीन मुलींचे अपहरण झाल्याने सातारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेचा तपास शाहूपुरी पोलिस गतीने करत आहेत. पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.29 रोजी सकाळी दहा वाजता त्यांची मुलगी शाळेला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परत आलीच नाही. तिचा शोध घेत असताना पिडितेच्या कुंटुबीयांना जबर धक्का बसला. कारण त्याचदिवशी तिच्या दोन मैत्रीनींचेसुध्दा अपहरण झाल्याची माहिती समोर आली. घाबरलेल्या कुटुंबियांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. तपास स.पो.नि. पुष्पा किर्दत करत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)