साताऱ्यातील ५९० दिव्यांग लोकांना रत्ना निधी ट्रस्ट तर्फे मदत 

सातारा- गुगल. ऑर्ग च्या सहकार्याने, अपंगत्व आणि शिक्षण केंद्रित, ना नफा ना नुकसान तत्वावर आधारित बिगर सरकारी मुंबई चीसंस्था  रत्ना निधी ट्रस्ट तर्फे मोबिलिटी इक्विपमेंट अर्थात हालचालीच्या  साधनांचे  वाटप करण्यासाठी साताऱ्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले.रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे शताब्दी वर्षाच्या उत्सवाचा भाग म्हणून हे शिबीर घेण्यात आले.याशिबिराला  रोटरी क्लब ऑफ बॉम्बे -हँगिंग गार्डन ने पाठिंबा देऊ केला. ५९० अपंग अर्थात दिव्यांग व्यक्तींना या वेळी जयपूर फूट, कॅलिपर्स आणिकर्ण यंत्र  मोफत  वितरीत करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात याच ठिकाणी आयोजित तपासणी शिबिरात लाभार्थ्यांची ओळख  करून घेण्यातआली.

यावेळी बोलताना राजीव मेहता यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेचे लोक समाजातील दिव्यांग  आणि विशेष गरज असलेल्या लोकांचे जीवनसुधारण्यासाठी उत्साही आणि कटीबद्ध आहे. या पूर्वी देखील मिशन मिलियन बुक्स च्या माध्यमातून रत्ना निधी ने इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर  हास्यफुलविले. आता ते  मोबिलिटी इक्विपमेंट घेऊन आले आहे. आम्ही याठिकाणी यजमान पद भूषवून  खूप आनंदित आहोत.

जुलै 2017 मध्ये, रत्ना निधीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणक, भूगोल आणि इतिहास यासारख्या विषयांचे  “मिशन मिलियन बुक्स”प्रकल्पाअंतर्गत सातारा येथे सुमारे 50,000 पुस्तकांचे दान केले होते. शब्दकोश आणि विश्वकोश देखील शाळा आणि वाचनालयात दान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटन शरद पवार यांनी केले होते. 2016 मध्ये अलिबाबा ग्रुपच्या सहकार्याने रत्न निधी यांनी ‘मिशन मिलियन बुक्सप्रोजेक्ट’ सुरू केले होते. “आम्ही रत्नानिधी ट्रस्टशी एक आजीवन संबंध प्रथापित करून, निराधार लोकांना सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न करीतआहोत असे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे – हँगिंग गार्डनचे अध्यक्ष, रोटेरियन अमीत पारीख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)