साताऱ्यातील सोनाराला चोरीप्रकरणी अटक

सराफा बाजारात खळबळ
सातारा-शाहूपुरीच्या हद्दीतील चोरीप्रकरणी एका महिलेसह चोरीचे सोने घेतल्याने सराफी व्यापाऱ्याला अटक झाल्याने शहरात खळबळ खळबळ उडाली आहे. या चोरीच्या गुन्ह्यात सातवी-आठवीतील दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी ताब्यातील सोनार व महिलेकडे पोलिस अधिक तपास करत आहेत.

तीन सप्टेंबर रोजी शाहूपुरी येथील महालक्ष्मी कॉलनीत झालेल्या घरफोडीत सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले होते. शकील इस्माईल चन्ने (रा. बुधवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना दोन शाळकरी मुलांची नावे समजली. ही घरफोडी आकाशवाणी समोरील झोपडपट्टीतील दोन मुलांनी केल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणच्या तपासात समोर आले. पोलिसांनी या सातवी व आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीमध्ये त्यांनी आपल्या दप्तरात पुडीत गुंडाळून ठेवलेले चोरीचे दागिने काढून दिले. चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 40 ग्रॅम वजनाचे सोने व 141 ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली.

यातील एक सोन्याची बांगडी महिलेला दिल्याचे मुलांनी सांगितले. संबंधित महिलेस पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. तिने साताऱ्यातील सराफास बांगडी विकून त्यातून नवीन सोन्याचे दागिने घेतल्याची कबूली दिली. पोलिसांनी तिच्याकडून दहा ग्रॅमचे 31 हजार 200 रुपये किंमतीचे दागिणे हस्तगत केले. या घरफोडीत पोलिसांनी चोरीला गेलेला एकुण 50 ग्रॅमचे सोने, 141 ग्रॅमची चांदी असा एक लाख 14 हजार 600 रुपयांचा ऐवज आरोपींकडून हस्तगत केला आहे.

या गुन्ह्यात सुरेखा सुभाष पवार (रा. आकाशवाणीसमोरील झोपडपट्टी) व शनिवार पेठेतील गुलाबजी हिंदूजा ज्वेलर्सचे मोतीलाल जेठमल जैन (वय 59, रा. शनिवार पेठ) यास अटक केली. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)