साताऱ्यातील बेकायदेशीर होर्डिंग

सातारा – साताऱ्यात दोन वर्षापूर्वी न्यायालयाच्या दणक्‍याने होर्डिंग नियमावलीची शिस्त निर्माण झाली होती ती पुन्हा बिघडली आहे. शहराच्या पश्‍चिम भागात सरासरी दीडशे होर्डिंग असे आहेत ज्याची खुद्द पालिकेलाच कल्पना नाही.

सातारा पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागात विभागप्रमुखाची गळचेपी सुरू असल्याने महसूल फासावर चढला आहे. साताऱ्यात सुस्वराज्य फाउंडेशनचे चंद्रशेखर चोरगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शहरात अवैध फलक झळकत असून त्यावर पालिकेचे कसलेही नियंत्रण नाही, अशा आशयाची ती याचिका होती. सातारा पालिकेने कारवाई केलेल्या लोकांची यादी न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने सातारा पालिकेचे कौतुक करत इतर पालिकांनी सातारा पालिकेचा आदर्श घ्यावा, असेही न्यायालयाने सूचित केले होते, असे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे म्हणणे होते.

-Ads-

मात्र, याचिकाकर्ते चंद्रशेखर चोरगे यांनी सातारा पालिकेमध्ये अनागोंदी कारभार असल्याचा आरोप करत ‘अद्याप ‘ असे फलक काढले जात नाहीत. फलक परवानगी घेऊन लावणे बंधनकारक असते. परंतु काहीजण परवानगी न घेता फलक लावतात. त्या फलकावर त्याची मुदत नमूद करावी लागते. मात्र, अनेक फलकांवर मुदत लिहिली जात नाही,” असा दावाही केला. फ्लेक्‍स लावणाऱ्यांवर दावे दाखल केले जातात. मात्र ज्यांच्यासाठी फलक लावण्यात येतो, त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असते. परंतु ज्यांनी फलक छापले त्याच्यावरच कारवाई केली जाते, असाही आरोप नागरिकांतून होत आहे. या तथ्यांशाचा भाग चार वर्षापूर्वी तपासला जात होता. मात्र गेल्या दोन वर्षात राधिका रोड कर्मवीर पथ राजपथ येथे सुमारे तीन डझन होर्डिंग टप्पाटप्पाने बदलले गेले मात्र त्यासाठी पालिकेला अंधारात ठेवले गेले.

स्थावर जिंदगी विभागाचे ढिसाळ व्यवस्थापनामुळे वाटोळ झाले आहे. त्या विभागातील राजकीय हस्तक्षेप नको इतका अडचणीचा झाला आहे. प्रति चौरस फूट पन्नास रुपये असा दर आणि रेकॉर्ड ला पस्तीस होर्डिंगला परवानगी ही वस्तुस्थिती आहे. मात्र भाडे अंदाजाचा पत्ता नसल्याने आणि स्थावरचे धोरणच मुळातच धरसोडीचे असल्याने साताऱ्यात पुन्हा होर्डिंग बोकाळले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)