साताऱ्यातील जवाहर बागेच्या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था

गुरूनाथ जाधव

सातारा –
स्वातंत्र्यपूर्व काळातील जवाहर बागेची दुरावस्था झाली आहे. सातारा शहराची स्थापना 17 व्या शतकातील आहे. श्री. छ. संभाजी महाराज यांचे पुत्र छ. शाहू महाराज यांनी सातारा शहराची स्थापना केली. त्यांच्या काळापासून वेगवेगळया टप्यावर सातारा शहराचा विकास होत गेल्याचे दिसत आहे. यामध्ये शहरातील वाडे, बाजारपेठा, प्रशासकिय इमारती, पाणी पूरवठा व्यवस्था, याच बरोबरीने बागा ही विकसित होत गेल्या. श्री. छ. प्रतापसिंह महाराज थोरले यांनी 1822 मध्ये जूना राजवाडा म्हणजे अत्ताचे प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी एक अतिशय देखणा व सुंदर राजवाडा बांधला व येथुनच राज्यकारभारास सुरूवात केली. याच राजवाड्यासमोर ही छोटी बागही तयार झाली.

श्री. छ. प्रतापसिंह महाराजांच्या नंतर थोड्याच कालावधीत साताराचा कारभार इंग्रजानी आपल्या हातात घेतला. इंग्रजांच्या कारकिर्दीतही साताऱ्यात अनेक सुधारणा झाल्या. नदी, ओढ्यावरचे पुल, पाणी व्यवस्था, प्रशासकिय इमारती, तुरूंग, यासारख्या इमारती इंग्रजानी अद्यावत तत्रांनी बाधुंन घेतल्या. सन 1865 साली जे. आर. ऑर्थर म्हणून साताराचे कलेक्‍टर होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक म्हणून राजवाडा समोरील बागेत. कारंजे उभारले गेले तसा शिलालेख कारंजावर कोरला आहे. अतिशय देखणे असलेले कारंजे पाश्‍चिमात्य शैलीवर उभारले आहे. त्याचबरोबर या बागेचे कंपाउंड वॉल, सार्वजनिक दिवा बत्तीची सोय असणारे लोखंडी खांब, यासारख्या गोष्टी आजही ब्रिटिश काळाची आठवण करून देत आहेत. गोल बागेचे खरे नाव जवाहर बाग.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे लोकांच्या स्मृतीपटलावरून पुसले गेले असले तरी या नावाची आठवण करून देणारा स्वातंत्र्यपूर्व काळातील 1946 चा एक शिलालेख गोल बागेच्या दर्शनी भागात बसविलेला आजही आढळतो. कधी काळी राजवाड्याच्या समोरच्या प्रांगणात बाजार बसत असे. त्यावेळी सातारा शहरात वाहनांची गर्दी ही कमीच होती. सातारामध्ये वस्ती वाढू लागली तशी या बाजाराच्या जागेचे रूपांतर चौपाटीमध्ये झाले.याच बागेत भारतातील पहिला अहिंसात्मक सत्याग्रह करणारे श्री. छ.प्रतापसिंह महाराज यांचा पुतळा आहे. या पुतळयाची उभारणी स्वांतत्र्य समर शताब्दी महोत्सव समीतीने केली. या पुतळयाचे अनावरण तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.पण आता गोलबागेचे अस्तित्वही अतिक्रमणांच्या, चोरांच्यामुळे धोक्‍यात आले आहे.

या ठिकाणी असणारे कंपाऊंड वॉलचे फेन्सिंग तुटले आहे. गोल बागेच्या कंपाऊंड वॉलवरील त्रिदल फुलांच्या आकाराच्या जाळया ब्रिटिश काळाची साक्ष देत आजही पहायला मिळतात. या जाळ्या ओतीव बीडाच्या आहेत. कदाचित त्या ब्रिटिश काळात इंग्लंडहून आयात केल्या असाव्यात. यातल्या निम्म्याहून जाळया चोरीला गेल्या आहेत आणि उरलेल्या देखील चोरीला जाण्याची शक्‍यता आहे.

सातारा नगरपरिषदेच्यावतीने काही वर्षापूर्वी गोल जवाहर बागेचे सुशोभिकरण करताना ब्रिटिशकालीन स्थापत्य शैलीतील कारंज्याच्या भोवतीने मुळ कारंज्यावर फवारा उडवणारी कारंजी बसविली. ही कारंजे वेगवेगळया रंगातील प्रकाशामुळे बागेचे सौंदर्य खुलवतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी पाण्याच्या सततच्या मारामुळे मुळ संगमरवरी कारंज्यास धोका पोहचत आहे. त्यावरील भागातील तबकाचा काही अंशी भाग तुटला आहे.

मुळचे कारंजे हे तीन तबकातून अतिशय अल्हाददायक पाणी व तुषार उडवणारे होते. खरेतर हे कारंजे स्मारक हा साताराच्या ब्रिटीशकालीन इतिहासाचा वारसा आहे. त्याचे सुशोभिकरण करताना मुळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. आता या कारंज्यावरच पिंपळ उगवला असल्याचे दिसत आहे. यामुळे भविष्यात या कारंज्याचे अस्तित्वच धोक्‍यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असताना सातारा नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. – निलेश पंडित, जिज्ञासा मंच, इतिहास संशोधन व संवर्धन सातारा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)