साताऱ्यातील चित्रकारांच्या प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी)- नुकतेच इंडियन आर्ट फिस्टा या मुंबई येथील प्रतिथयश संस्थेमार्फत फोर्ट येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या कुमारस्वामी आर्ट गॅलरी या कला दालनात चित्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात साताऱ्यातील चित्रकार विनया कुलकर्णी, चित्रकार जयंती जाधव, फाल्गुनी देशपांडे, प्राची शहा, सागर बोन्द्रे व सागर गायकवाड यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली. देशविदेशातील अनेक नामवंत चित्रकारांनी यात भाग घेतला होता.

मुंबई येथील इंडियन आर्ट फेस्टा ही प्रथितयश संस्था दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील हे प्रदर्शन भरवते. देशासह विदेशातील चित्रकार या प्रदर्शनात आपली चित्रे प्रदर्शित करण्यास उत्सुक असतात. देशाच्या विविध भागातील चित्रकारांना त्यांच्या प्रतिभेचे व्यासपीठ खुले करून देण्याची भूमिका इंडियन आर्ट फिस्टा ची असते. महाराष्ट्रासह प. बंगाल, दिल्ली, उ.प्रदेश, म. प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान चे चित्रकार आवर्जून आपल्या प्रतिभा कॅनव्हासवर उतरवत असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वर्षी प्रदर्शनाचे उद्‌घाटन जे जे स्कूल ऑफ आर्ट च्या प्रा.डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणामधून उपस्थित कलाकारांना मौलिक मार्गदर्शन केले.
हे प्रदर्शन पाहण्यास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, सौ. पडसलगीकर, आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट चित्रकार प्रमोद कुरळेकर, सुनील महाजन,सत्यजित वरेकर, प्रथितयश उद्याजक गोविंद जोशी तसेच विविध क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी होती.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)