साताऱ्यातील गल्लीबोळांनाही कोंडीचे ग्रहण

सातारा – पोवईनाक्‍यावरील ग्रेडसेप्रेटरच्या कामासह शहरातील अन्य रस्त्यांवरही कोणती ना कोणती कामे सुरु आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने शहरातील गल्लीबोळांनाही वाहतुकीच्या कोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे एकंदर शहरातील सर्वच नागरिक त्रासून गेले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी पोवईनाक्‍यावर भव्य अशा ग्रेडसेप्रेटरच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील सर्वच वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोवईनाक्‍यावर सुरु झालेल्या कामामुळे वाहतूक अन्य रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे काही अंशी का होईना वाहतुकीचा ताण कमी झाला होता. परंतु, पालिका प्रशासनाने शहरातील अन्य रस्त्यांवरही खोदकामे, खड्डे मुजविण्याची कामे काढून ती कामे निवांतपणे करण्यास सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, ही कामे सुरु करताना वाहतुकीला पर्यायी मार्गदेखील न दिल्याने शहरातील रस्त्यांवर तासन्‌तास वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सुरु झाले. शाहूपुरी येथेही पुलाच्या कामाला सुरुवात केली असून हे कामदेखील दीर्घकाळ चालणार असल्याने शाहूपुरीसह परिसरातील नागरिकांच्या अडचणीत भरच पडली आहे.

पाईपलाईनच्या गळती काढण्यासाठी तसेच नव्या पाईपलाईन टाकण्यासाठी पालिकेने शहरातील रस्ते खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनधारक रस्ता शोधत शहरातील गल्लीबोळांमध्ये घुसत आहेत. त्यामुळे नागरिकांना शहरातील रस्त्याने चालणेही जिकीरीचे होऊन बसले आहे. शहरातील रस्त्यांबरोबरच गल्लीबोळांनाही वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले असून हे ग्रहण सुटणार तरी कधी? या चिंतेने सातारकर नागरिक त्रासले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)