साताऱ्यातील अजंठा लॉजवर पोलिसांचा छापा

उपअधिक्षक समीर शेख यांची कारवाई; तीन पुरूषांसह महिला ताब्यात

सातारा –
सातारा शहरातील देवी चौकात असणाऱ्या अजंठा लॉजवर पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांनी तीन पुरूष व तीन महिलांना ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने केली. चंद्रकांत राजाराम घोरपडे, हेमंत चंद्रकांत घोरपडे (दोघे रा. केसरकर पेठ,सातारा) शाम सदाशिव पवार असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी महिला पोलीस प्रतिभा कर्पे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.सातारा शहरात वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या पथकाने ही करावाई केली. शनिवारी दुपारी पोलिसांचे पथक देवी चौकात असलेल्या अजंठा लॉजवर पोहचले. त्यावेळी पोलिसांना चार पुरूष व तीन महिला मिळुन आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत शाहूपुरी पोलीस चौकीत नेले.

त्यावेळी चौकशी करून पोलिसांनी चंद्रकांत राजाराम घोरपडे, हेमंत चंद्रकांत घोरपडे (दोघे रा. केसरकर पेठ, सातारा), शाम सदाशिव पवार यांच्यावर पैशाचे आमिष दाखवून महिलांना वेश्‍या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 

… म्हणे कुणालाही सांगा माहिती देणार नाही
सातारा शहरात लॉजवर छापा टाकल्याची बातमी शहरभर पसरली होती. नेहमीप्रमाणे माध्यमप्रतिनिधी त्याची माहिती घेण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी तिथे असलेल्या हवालदार अजित माने यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी याची माहिती सहाय्यक अधिक्षक समीर शेख यांना माहिती दिली. शेख यांनी पोलिस ठाण्यात फोन करून माहिती देण्याची सुचना केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी माहिती घेण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फोन केला. तेव्हा तुम्ही वरिष्ठांना फोन करून त्रास देता. कुणालाही सांगा मी माहिती देणार नाही असे उद्धट बोलत अजित माने यांनी फोन ठेवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)