साताऱ्यातही मुलींची बाजी

जिल्ह्याचा निकाल 92 टक्के

सातारा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या बारावी परिक्षेच्या निकालामध्ये सातारा जिल्ह्यातील 91.14 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणे या ही वर्षी सातारा जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी अधिक राहिली आहे. उत्तीर्ण होणाऱ्यामध्ये मुलींचे प्रमाण 95.21 टक्के तर मुलांचे 83.91 टक्के असल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे.

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा 21 फेब्रुवारी महिन्यामध्ये पार पडल्यानंतर बुधवार दि.30 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील 239 महाविद्यालयातील एकूण 38 हजार 51 विद्यार्थी परिक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 34 हजार 679 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण सरासरी निकाल 91.14 टक्के इतका लागला आहे. दरम्यान, परिक्षा देणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या 22 हजार 130 इतकी होती त्यापैकी 18 हजार 570 मुले उत्तीर्ण झाली. तसेच 17 हजार 329 मुलींनी परिक्षा दिली होती त्यापैकी 16 हजार 499 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)