साताऱ्याच्या लेकींचा दुबईत अटकेपार झेंडा

दुबई येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक

सातारा – पदन्यास एन्टरटेनमेंट संस्थेच्या मेघा संपत यांनी आयोजित केलेल्या, दुबई येथे पार पडलेल्या इंडियाज इंटरनॅशनल ग्रुव्हफेस्टमध्ये नृत्यांजली संस्थेच्या विद्यार्थिनी पूर्वा शास्त्री-आवटे आणि विभावरी वैद्य यांनी शास्त्रीय नृत्यशैली प्रकारात भरतनाट्यम्‌ सादर करुन सुवर्णचषक व पदक पटकावले. हार्टलॅण्ड इंटरनॅशनल स्कूल, दुबई येथे झालेल्या स्पर्धेत भारतासह, दक्षिण आफ्रिका, ओमान, दुबई, कोरिया, चीन या देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

पूर्वा शास्त्री आणि विभावरी वैद्य यांना राजेश जोशी तसेच नृत्यसंस्थेच्या संचालिका वैशाली पारसनीस यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सुप्रसिद्ध नृत्यांगना सुधा चंद्रन आणि मेलवीन लुईस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पूर्वा आणि विभावरी दोघींचेहीे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)