सातार्‍यात 20 किलो प्लास्टिक जप्त

प्लास्टिक बंदीचे उल्लंघन ः सहाजणांवर कारवाई, 30 हजारांचा दंड

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) -सातारा शहरातील दुकांनाची तपासणी मोहीम महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशीक कार्यालय व सातारा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या सहा व्यवसायीक दुकानदारांवर 30 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. वीस किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले. यामध्ये राजेंद्र वाघमारे शिवराज ट्रेडर्स , अनिल बाळु शेळके बालाजी नमकीन, संतोष मोहिते, मोहिते किराणा स्टोअर्स,दिनेश कोठारी गुरूनाथ कृपा, प्रशांत पाटकर शिरीष स्टोअर्स भवानी पेठ, इम्रान मोमीन सदाशिव पेठ, या सहा जणांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे एकुण तीस हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्लॅस्टिक मुक्ती आणी थर्माकोल मुक्त महाराष्ट्र अभियानाकडे व्यावसायीक दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करत असल्याची माहिती उपप्रादेशीक प्रदुषण महामंडळ कार्यालयाचे प्रमुख बाबासाहेब कुकडे यांनी यांनी दिली. यापुढेही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)