सातार्‍यातील स.पो.नि पोरे यांच्यावर कारवाई

 

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; एसपींनी ठोठावला दोन हजारांचा दंड

-Ads-

गोडोली,  (प्रतिनिधी) :
दाखल गुन्ह्यात तपासकामी कुचराई केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे यांना दंडाची शिक्षा झाली. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. सातारा शहरातील शिवकृपा पतपेढीच्या संचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना स.पो.नि. पोरे यांनी योग्य तपास न करता आरोपींना सहकार्य केल्याची तक्रार शिवाजी सावंत यांनी जिल्हा पोलिस प्रमुख याच्यांकडे केली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश एसपी पंकज देशमुख यांनी दिले होते. चौकशीअंती पोरे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे सिध्द झाले. याप्रकरणी पोरे यांना दोन हजार रुपयांचा दंड जिल्हा पोलिस प्रमुखांनी ठोठावला. दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यावरील कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पंकज देशमुख यांची सातार्‍यातील ही पहिलीच कारवाई अाहे.

काय आहेत पोरे यांच्यावरील आरोप

शिवकृपा पतपेढीच्या संचालक मंडळाला दर मंगळवारी व शुक्रवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर शिवाजी सावंत तक्रारदार असलेल्या एका प्रकरणात सातारा येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. परंतु त्याचे पालन झाले नाही. सदर माहिती तपासी अधिकारी पोरे यानी न्यायालयापासुन दडवली. व केवळ कागदोपत्री दिखावा करुन आरोपींना वाचविण्यासाठी सहकार्य केले.असे सावंत यांचे आरोप आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
66 :thumbsup: Thumbs up
11 :heart: Love
4 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
13 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)