सातारा, दि.13 (प्रतिनिधी) -गेली अनेक दिवस गाजत असलेला विसर्जनाचा प्रश्न अन त्यामुळे प्रलंबीत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचा तिढा अखेर सुटला. जिल्हा पोलिस प्रशासनाने सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्चीत केला आहे. सातारा शहरातील गणेश मंडळांना चांदणी चौकातून मिरवणुकीला सुरूवात करता येणार आहे. त्यानंतर मिरवणुका चांदणी चौक ,तांदुळ आळी, मोती चौक,कमानी हौद,शेटे चौक,501 पाटी या मार्गावरून मोती चौकात थांबतील. असे पोलिस प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. तर शहरातील मंडळांच्या व घरगुत्ती मुर्ती विसर्जनासाठी नगरपालीकेचा पोहण्याचा तलाव,हुतात्मा स्मारक येथील कृत्रीम तळे, दगडी शाळा कृत्रीम तळे,कल्याणी शाळा कृत्रीम तळे, गोडोली येथील तळे, कण्हेर येथील खाण हे विसर्जनाचे पर्याय देण्यात आले आहेत.
मिरवणुका संपल्यानंतर चार फुटापेक्षा मोठया मुर्ती मोती चौक,राधिका रोडने एसटी स्टँड मार्गे हुतात्मा स्मारका जवळील कृत्रीम तळ्याकडे किवा गोडोली तळ्याकडे जातील. याठिकाणी बारा फुटाच्या आतील मुर्तींचे विसर्जन करता येणार आहे. तसेच ज्या मंडळांना व नागरिकांना घरगुत्ती मुर्तींचे विसर्जन कण्हेर धरणाजवळील खाणीत करायचे आहे. त्यांच्यासाठी हुतात्मा स्मारकाजवळ नगरपालीकेच्या वतीने मुर्ती खाणीकडे नेण्याची व्यवस्था केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)