सातार्‍यातील तरूणाईचा थर्टी फस्टचा अनोखा ‘एहसास’

 

युवक युवतींचा उपक्रम; मतीमंद मुलांना केली मदत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 सातारा, दि. 31  –

एकतीस डिसेंबर तथा थर्टी फस्ट म्हटले की नुसता चंगळवाद, संगीताच्या तालावर थिरकणारी तरूणाई असेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र या सगळ्याला अपवाद ठरली आहे, सातार्‍यातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातील तरूणाई! या महाविद्यालयातील युवक युवतींनी शेंद्रे ता. सातारा येथील एहसास या मतीमंद मुलांच्यासोबत थर्टी फस्ट साजरा केला. या आधारकेंद्रातील मुलांना उबदार कपडे,किराणा साहित्याचे वाटप करून या युवक युवतींनी खर्‍या अर्थाने थर्टी फस्टचा अनोखा एहसास समाजासमोर निर्माण केला आहे.

सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयात शिकणार्‍या मयुरी फडतरे,अश्विनी सोनावणे,प्रियांका पवार, ज्योत्स्ना पिंपळे, सुप्रिया पोतेकर, पूजा चव्हाण,सोनाली चव्हाण, तुषार पवार,निखील पवार, अक्षय शिंदे, शिवम महापरळे,कौस्तुभ भोसले या विद्यार्थ्यांनी गेली तीन वर्षे आपला आनंद एहसास’मधील मतीमंद मुलांच्यासोबत वाटला आहे. सन 2016 पासून ही तरूणाई या आधार केंद्रात आपला थर्टी फस्ट साजरा करत आहे. यामध्ये मतीमंद मुलांना उबदार कपडे देणे,खाद्यपदार्थाचे वाटप, आवश्यक किराणा साहित्य, औषधोपचाराचे साहित्य म्हणून दिले. एकाबाजुला थर्टी फस्ट म्हणजे केवळ समुद्रकिनारी अथवा महागड्या हॉटेलमध्ये साजरा करण्याचे, मोठमोठ्या आवाजत सुरू असलेल्या गाण्याच्या तालावर नाचत साजरा करण्याचे फॅड असताना,दुसर्‍या बाजूला सातार्‍यातील या
तरूणाईने या सगळ्याला छेद देत, समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

31डिसेंबर म्हणजे पार्टी ,फुल्ल धम्माल हीच संकल्पना असते, पण समाजात असे काही घटक आहेत ज्यांना आपल्या प्रेमाची आणि थोड्याफार मदतीची गरज असते. पार्टीसाठी पैसे वाया घालवण्यापेक्षा एखाद्याला मदत करू हाच विचार आम्ही समाजातील आमच्या समवयस्कांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. 31 डिसेंबरचे औचित्य साधून आम्ही सगळेजण सातारा पासून जवळच असलेल्या शेंद्रे येथील एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथे जाऊन पोहोचलो. पाहिल्यावर्षी म्हणजे सन 2016 मध्ये फळांचे व आरोग्याला हितकारक वास्तूंचे वाटप केले.

दुसयर्‍यावर्षी त्यांची आर्थिक नड काही प्रमाणात कमी करण्याचा छोटासा प्रयत्न केला. एहसास चे सगळे कामकाज संदीप कांबळे पाहतात. त्यांना या गृपमधील सदस्यांनी फोन करून आवश्यक साहित्याची यादी मागवली. कांबळे यांनी दिलेल्या यादी नुसार या तरूणांच्या गृपने यावर्षी किराणा साहित्य मदत म्हणून दिले. अशी माहिती या युवक युवतींनी दिली.

रंजल्या गांजल्याशी म्हणावे आपुला
समाजात मोठ्यांना मदतीचा ओघ मोठाच असतो. मात्र जिथे गरज आहे अशा ठिकाणी अपेक्षीत मदत होताना दिसत नाही. म्हणून रंजल्या गांजल्याशी म्हणावे आपुला या युक्ती प्रमाणे आम्ही थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी जो काही पैसा खर्च होईल,तो एहसास या केंद्राला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला.

          – मयुरी फडतरे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)