सातार्‍यातील ऑफिसर क्लबजवळ गोळीबार?

सोमवारची घटना; पोलिसांनी दोन पुंगळ्या हस्तगत केल्याची चर्चा
सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) –

सोमवारी दि.22 रोजी सातारा शहरातील ऑफिसर क्लबजवळ सायंकाळी गोळीबार झाल्याची चर्चा आहे. यावेळी संबधितांनी एकुण दोन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याने काही अनुचित प्रकार झाला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,दोन पुंगळ्या हस्तगत केल्या.मात्र हा गोळीबार नेमका कोणी व का केला? हे अद्याप कोणालाही समजु शकले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमवार दि.22 रोजी जुना मोटार स्टँड परिसरातील एका दारुच्या दुकानाचे अतिक्रमण काढण्यावरून दोन्ही राजे आमनेसामने आले होते. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी तात्काळ तणाव नियंत्रणात आणला होता.तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने व शाहूपुरीचे पो.नि.किशोर धुमाळ यांनी दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांना हटकल्याने दोन्ही राजेंच्यात होणारा संभाव्य राडा टळला होता.

दरम्यान राजेंच्या या वादाची माहिती सोशल मिडीयावरून वार्‍यासारखी शहरासह जिल्ह्यात पसरली होती. त्यामुळे नागरिकांच्या मानात गतवर्षीच्या कोजागिरी पोर्णीमेच्या आठवणींनी काहूर माजवले. शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र राजमाने व किशोर धुमाळ यांनी अतंत्य चाणाक्षपणे परिस्थिती नियंत्रणात आणली.

परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहितीही सोशल मिडीयावर पसरल्याने नागरिकांना हायसे वाटले. पोलिसांच्या प्रयत्नाने जुना मोटार स्टँड परिसरातील तणाव निवळला असताना, आफिसर क्लबजवळ फायरिंग झाल्याचा आवाज आला.

त्यामुळे राजेंच्या वादामुळे भयभित झालेल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत अजुन एक फायरिंग झाले होते. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पुन्हा एका पोलिस अधिकर्‍याला दिली.त्यानंतर घटनास्थळी पोलिस जवान दाखल झाले.

पोलिसांना त्या ठिकाणी दोन रिकाम्या पुंगळ्या मिळुन आल्याचेही एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मात्र हा गोळीबार नेमका कोणी केला. त्यापाठीमागे काय कारण असावे याचा शोध पोलिस घेत असल्यानेच अद्याप तरी कोणावरही गुन्हा दाखल झाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)