खरेदी केलेल्या गाडीची रक्कम न देता घेतलेली गाडी परत न दिल्याने फसवणुक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.दत्तात्रय महादेव तोडकर रा. करंजे पेठ, सातारा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या मालकीची इनोव्हा कार क्र एम एच 11 ए के 7547 ही गाडी समीर इनामदार ( पुर्ण नाव माहित नाही ) याला 7 लाख रुपयाला विकली होती.

व्यवहारत ठरलेल्या रकमेपैकी संशयिताने 2 लाख दिले होते. व बाकी 5 लाख रुपयांचा देना बॅंकेचा धनादेश दिला होता मात्र दिलेला धनादेश वटला नसल्याने इनामदार याच्याकडे पैशाची मागणी केली होती.

पण त्याने पैसे व गाडी परत देण्यास टाळाटाळ करत 5 लाखांची फसवणुक केली होती. दरम्यान तोडकर यांनी याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.

दाखल तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पो.नि. किशोर धुमाळ यांनी गाडीबाबत अधिक माहिती घेतली असत मायणी ता. खटाव येथील एका व्यक्तीकडे सदर गाडी असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

मायणी येथील एकाला त्याच गावातील एका चारचाकी विक्रेत्याने विकल्याचे तपासात समोर आले आहे. त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड कोण ते समोर आले

याप्रकरणी पाटोळे, देशमुख,इनामदार यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हा दाखल झाल्यापासुन अवघ्या दोन दिवसात उघड केल्याने पो.नि. किशोर धुमाळ,पो.ना. किशोर जाधव,प्रविण गोरे,अमित माने,मोहन पवार यांचे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील,अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार,उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)