सातारा: 10 हजार रुपयाची लाच मागणारा ग्रामसेवक रंगेहाथ जाळ्यात

सातारा – किडगाव ता सातारा येथील स्मशानभूमी व समाज मंदिराचे बांधकाम बिल काढण्यासाठी अडीच टक्के प्रमाणे साडे दहा हजार रूपयांची लाच घेताना ग्रामसेवक राहुल शेळके रा सत्वशील नगर संभाजीनगर सातारा याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले . दुपारी तीनच्या दरम्यान पंचायत समितीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. शेळके यांचा तक्रार दाराकडे बिलाच्या कमिशनसाठी वारंवार तगादा सुरू होता.

किडगाव ग्राम पंचायत हद्दीत समाजमंदिर व स्मशानभूमी अद्ययावतीकरणाचे काम ठेकेदाराने केले होते . त्याची बिले ग्रामपंचायतीला सादर करण्यात आली होती . ग्रामसभेच्या अंतिम मान्यतेसाठी शेळके यांच्याकडून दहा हजार रुपये कमिशनची मागणी झाल्याने तक्रार दाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे तक्रार केली.तडजोडीअंती ठरलेली साडेनऊ हजाराची रक्कम घेताना पोलीस निरीक्षक बया जी कुरळे यांच्या पथकाने त्याला पंचायत समितीच्या आवारात रंगेहाथ पकडले . सातारा शहर पोलीस ठाण्यात संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)