सातारा हिल सायक्‍लोथॉनमध्ये प्रकाश ओलेकरने मारली बाजी

सातारा, दि. 25 (प्रतिनिधी)- यंग इन्स्पिरेशन चॅरिटेबल सोसायटीमार्फत झालेल्या द्वितीय सातारा हिल सायक्‍लोथॉन मध्ये प्रकाश ओलेकर याने 60 किमी च्या मुख्य स्पर्धेमध्ये 1.43.36 एवढे विक्रमी वेळ घेऊन प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर अनुक्रमे विजय सपकाळ द्वितीय तर निकेत पाटील याचा तिसरा क्रमांक आला.
मुलींमध्ये मनवी पाटील ही 2.25.06 वेळेवसह प्रथम, चैताली शिलदनका द्वितीय तर प्रांजली पाटोळे हिचा तिसरा क्रमांक आला.
दरम्यान 60 किमी मुख्य स्पर्धा व 15 किमी फन राईडची सुरवात तालीम संघ मैदान इथून माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ध्वज दाखवून सुरुवात झाली. तालीम संघ, राजवाडा, समर्थ मंदिर, बोगदा, यवतेश्‍वर मार्गे कास व परत तालीम संघ अशा मार्गावर मुख 60 किमी स्पर्ध पार पडली. यामध्ये स्त्री व पुरुष मिळून साधारण 210 स्पर्धकांचा सहभाग होता. तसेच तालीम संघ मैदानावरून सुरु झालेल्या 15 किमी फन राईडमध्ये 200 लोकांनी भाग घेऊन उत्साहात स्पर्धा पूर्ण केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सातारा हिल सायक्‍लोथॉनचे अध्यक्ष प्रफुल्ल शाह, उपाध्यक्ष अलनकर जाधव, माजी अध्यक्ष मंगेश जाधव, सचिव सुनिल गंबरे, विशाल जगदाळे, अक्षय जाधव व इतर सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन कट्टा ग्रुप शाहूपुरी यांच्यावतीने करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)