सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत मनोहर जेधेंचे यश

मांढरदेव, दि. 4 (प्रतिनिधी) – सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेसाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक धावपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वाई तालुक्‍यातील वेलंग गावचे मनोहर लक्ष्मण जेधे यांचा व्हेटरन (40 ते 50 वयोगट) गटात द्वितीय क्रमांक आला. अतिशय अवघड असणाऱ्या या स्पर्धेचे 21 कि. मी. अंतर त्यांनी अवघ्या 1 तास 26 मिनिटात पूर्ण करत हे यश संपादन केले.
मनोहर जेधे हे शेतकरी असून ते एका पतसंस्थेचे डेली कलेक्‍शनचे काम करतात. त्याचबरोबर टेंपो चालवून आपली उपजीविका करतात. दररोज सकाळी धावण्याचा सराव वेलंग गावच्या परिसरात करतात. त्यांचा मुलगा सुशांत जेधे हा राष्ट्रीय खेळाडू आहे. तो लहान असताना त्याचा सराव ते घेत व त्याच्याबरोबर धावत. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी धावायला सुरुवात केली व हे यश संपादन केले. मनोहर जेधे यांनी सलग सात वर्षे सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. यावर्षी त्यांनी अतिशय उत्तम वेळ नोंदवली.मनोहर जेधे यांनी यापूर्वी पाचगणी मॅरेथॉन, गोवा मॅरेथॉन, जरंडेश्‍वर गिर्यारोहण, मुंबई मॅरेथॉन, शिरवळ, कराड, वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धेत यश संपादन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)