सातारा : स्वप्नालीचे यश ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी : शिवेंद्रसिंहराजे 

सातारा : स्वप्नाली सराटे हिचा सत्कार करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले शेजारी मान्यवर.

सातारा – आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांना आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय शिक्षण हे महत्वाचेच आहे. कुसवडे सारख्या ग्रामीण भागातील स्वप्नाली सराटे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपदान केले आहे. तिचे हे यश ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्‌गार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

कुसवडे (ता. सातारा) येथील शेतकरी कुटुंबातील स्वप्नाली शिवाजी सराटे या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्वल यश संपदान केले आणि तिची मंत्रालयात क्‍लार्क म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल स्वप्नालीचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी रवींद्र यादव, शिवानी सराटे, राजेंद्र यादव, अमर मोरे, जमीर मुल्ला, रोहन सराटे आदी उपस्थित होते. या यशाबद्दल स्वप्नालीचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, तालुका बाजार समितीचे सभापती ऍड. विक्रम पवार, सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)