सातारा : स्टेअरिंग लॉक झाल्याने जीपला अपघात

कराड : कराड बसस्थानाकानजीक असलेल्या कर्मवीर चौकात एका खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीचे स्टेअरींग लॉक झाल्याने या प्रवासी जीपने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या चारचाकी कारला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. या चौकात ठराविक वेळातच वाहतूक पोलीस थांबत असतात. त्यामुळे याठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बसस्थानकानजीक असलेल्या कर्मवीर चौकातून प्रवासी वाहतूक करणारी जीप निघाली होती. यावेळी अचानकपणे गाडीचा हॅन्डल लॉक झाल्याने ही गाडी रस्त्याचे कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या चारचाकी वाहनावर जाऊन धडकली. यामुळे या मार्गावरील वहातुक बंद झाली. या चौकात वाहतूक पोलीस ठराविक वेळेतच उभे असतात. त्यामुळे अपघातानंतर ही बराच काळ वहातुक ठप्प झाली होती. अखेर नागरिकांनी मध्यस्थी करीत वहाने इतरत्र काढीत वाहतूक सुरळीत केली.

कर्मवीर चौक हा वर्दळीचा व रहदारीचा असतानाही याठिकाणी रस्त्याचे दुतर्फा खाजगी वाहनांचा विळखा सतत असतो. कर्मवीर चौकात आठवडापूर्वी सिग्नल यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मात्र ही यंत्रणा नक्की केव्हा सुरु होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)