सातारा : सोनगाव खुनातील आरोपींना बारा तासात बेडया 

बक्षीसावरून झाला होता खुन ; सपोनि जीवन माने यांची कारवाई 
सातारा – लग्नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना जावळी तालुक्‍यातील सोनगाव येथे मंगळवारी घडली होती . राहूल मेंगळे (वय 35) याचा लग्नात मिळालेल्या बक्षीसाची रक्कम न दिल्याच्या कारणावरून खुन करून आरोपी फरार झाले होते.

मेढा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. मोहन सुखदेव मेंगळे, अनिल मोहन मेंगळे, विशाल मोहन मेंगळे, सनी मोहन मेंगळे व नंदा मोहन मेंगळ (सर्व रा. सोनगाव, ता. जावळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

घटनेनंतर संबंधित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केल्याने मेढा पोलिसांच्या पुढे मोठे अव्हाण होते.मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी अजीत टिके यांच्या मार्गदर्शनाखली सपोनि.जीवन माने व अमोल पवार,नितीन मुसळे,नंदु फाळके,संजय तडाखे,अमर जाधव ,प्रकाश घनवट,श्रीकांत बामणे,शामल चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध घेऊन पाचही आरोपींना बारा तासाच्या आत अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
5 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
3 :blush:
2 :cry:
44 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)