सातारा सैनिकी शाळेस 1 कोटी 32 लाखांचा निधी

वाटप करण्यास शासनाची मंजूरी

पुणे – सातारा येथील सैनिकी शाळेस 1 कोटी 32 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली असून त्याबाबतचे आदेशही जारी केले आहेत. 23 जून 1961 रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व स्तरातील गरीब व होतकरु मुलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून भारतातून सैन्य दलात अधिकारी पदावर संधी मिळावी या उद्देशाने ही शाळा सुरु करण्यात आली आहे. या शाळेतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित भरती झाले आहेत.

-Ads-

सैनिकी स्कूल सोसायटी व राज्य शासन यांच्यात सातारा सैनिकी शाळेबाबत 30 डिसेंबर 2016 रोजी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. त्यानुसार या शाळेला वेतनेत्तर अनुदान मंजूर करण्यात येते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी या सैनिकी शाळेसाठी 9 कोटी 88 लाख रुपयांचे अनुदान देण्याबाबतचे अंदाजपत्रक 12 नोव्हेंबर 2018 रोजी शासनाकडे मान्यतेसाठी सादर केले होते.

सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी वेतनेत्तर लेखाशिर्षाखाली 6 कोटी 63 लाख 48 हजार रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आलेली आहे. शाळेसाठी सन 2018-19 मध्ये 1 कोटी 87 लाख 59 हजार 38 रुपयांच्या निधीची आवश्‍यकता होती. मात्र शासनाने प्रत्यक्षात 1 कोटी 31 लाख 92 हजार 442 रुपयांचा निधी अदा करण्यास मान्यता दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी भोजनभत्ता म्हणून 92 लाख 18 हजार 160 रुपये, इमारत देखाभाल खर्चासाठी 14 लाख रुपये, घोडा देखभाल खर्चाकरिता 17 लाख 32 हजार 500 रुपये, जाहिरात खर्चासाठी 6 लाख 38 हजार 34 रुपये, नगरपालिकार कर अदा करण्यासाठी 2 लाख 3 हजार 718 रुपये याप्रमाणे निधीला मंजूरी दिली आहे. निधी वितरीत करण्यासाठी शिक्षण आयुक्तांवर नियंत्रक अधिकारी तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या लेखा विभागाच्या सहायक संचालकांवर आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव स्वा.म.नानल यांनी काढले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)