सातारा : सायगावचे सुपुत्र देशमाने बनले आयपीएस अधिकारी

जिल्ह्याच्या मानात आणखी एक तुरा

सातारा- सायगाव ता जावळी येथील ग्रामीण भागात जन्मलेले विक्रम नंदकुमार देशमाने यांनी उपायुक्त पदावर उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे राजसरकारने त्यांना आय पी एस केडर बहाल केले आहे.विक्रम देशमाने हे सध्या मुबई (डोंबिवली) येथे उपायुक्त म्हणून काम करीत आहेत.वयाच्या बेचाळीसाव्या वर्षीच त्यांनी हे यश मिळवून एक विक्रम साधला आहे.आय पी एस केडरमध्ये त्यांचा समाविष्ट झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या सायगाव गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

विक्रम देशमाने यांचे वडील हे सैन्य दलात कार्यरत होते.त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कुल मध्ये झाले,वडील सैन्यात असल्यामुळे घरातील शिस्तीमुळे विक्रम देशमाने हे खऱ्या अर्थाने घडले. च्या राज्यसेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ते डी वाय एस पी (पोलीस उपविभागीय अधिकारी) परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यांनी आपल्या वीस वर्षांच्या सेवेत नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन त्यांनी पुढे चंद्रपूर,नाशिक शहर,ठाणे (जवाहर),सांगली (इस्लामपूर) पुणे,ठाणे,मुबंई अशा शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती भूमिका बजावली.तर आता सध्या ते मुबंई डोंबिवली येथे उपायुक्त पदावर काम करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात वाहतूक सेवेत उपायुक्त म्हणून सेवा बजावताना त्यांनी पुण्यातील वाहतुकीस शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता.तर चंद्रपूर सारख्या नक्षली विभागात त्यांनी आपल्या उपविभागीय पोलीस अधिकारी सेवेला सुरुवात करताना धडाडीने सेवा बजावत नक्षली कारवायांचा सामना केला.

विक्रम देशमाने यांच्या पोलीस दलातील उत्कृस्ट कामगिरीमुळे राज्यसरकारने त्यांना आय पी एस केडर बहाल करण्याचे ठरवले त्यादृष्टीने तसा प्रस्ताव केंद्रसरकारला पाठवण्यात आला.नुकतीच केंद्रसरकारचे अंडर सेक्रेटरी अजयकुमार सिंग यांनी त्यासमबंधीची नोटिफिकेशन देखील लागू करण्याचे निर्देश दिले.सायगावचा सुपुत्र विक्रम देशमाने हे आय.पी.एस झाल्याची बातमी सायगाव विभागात पसरताच नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला तर वडील नंदकुमार देशमाने,बंधू प्रवीण देशमाने यांचे तालुक्‍यातील नागरिकांनी अभिनंदन केले.

हॉकीतही विक्रम यांचा विक्रम
विक्रम देशमाने यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कुलमध्ये झाले.अगदी प्राथमिक शाळेपासून त्यांना मैदानी खेळांची आवड होती.सैनिक स्कुल मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी हॉकी खेळात राज्यस्तरापर्यंत हॉकी तुमचे प्रतिनिधित्व केले होते.तर फर्ग्युसन कॉलेज मध्ये पदवी चे शिक्षण घेत असताना देखील विक्रम देशमाने यांनी कॉलेजमधील हॉकी टीम चे प्रतिनिधित्व केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)