सातारा: सातव्या आयोगाच्या मागणीसाठी ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर

दहिवडी – आपल्या विविध मागण्यासाठी देशभरातील ग्रामीण डाक सेवकांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात माण-खटावसह जिल्ह्यातील नऊशेहून अधिक डाक सेवक सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात डाक सेवा विस्कळीत होणार आहे.

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना (Aigds) आणि नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक यांच्यावतीने हा संप पुकारण्यात आला आहे. ग्रामीण व शहरी डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, ही प्रमुख मागणी सेवकांची आहे. याशिवाय निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे, इतरही काही मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काल प्रशासनाबरोबर संघटनाची चर्चा झाली पण, प्रशासनाने फक्त आश्‍वासन दिले. त्यामुळे अखेर संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे Aigds चे जिल्हा उपाध्यक्षा कॉम्रेड मिनाताई बडवे यांनी सांगितले.

यापूर्वी जुलै महिन्यात आम्ही सात दिवस संप केला होता. यावेळी मोदी सरकारचे आम्हाला लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. त्याचबरोबर सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. कमलेशचंद्र समितीच्या शिफारसी सादर करून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. परंतु कॅबिनेटमध्ये संबंधित समितीचा निर्णय बाकी आहे. मोदी सरकारकडून जाणीवपूर्वक चालढकल करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

या संपात पोस्ट खात्यातील तीन संघटना सहभागी होणार आहे. देशभरात 2 लाख 70 हजार डाक सेवक आहेत. हे सर्व जण संपावर जाणार आहेत. सातारा शहर आणि जिल्हा मिळून नऊशेहून अधिक डाक सेवक आहेत. हे सर्वजण संपात सहभागी होणार आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातील टपाल सेवा पूर्ण ठप्प होणार आहे. पत्राचे वाटप तसेच इतर संदेश पोहचवण्याचे काम ग्रामीण भागात या डाक सेवकांमार्फतच होत असते. आता ते ठप्प होणार आहे. हा संप किती काळ सुरू राहील, याचा अंदाज नसल्याने त्याचा परिणाम ग्रामीण नागरिकांवर होणार आहे.

आज दहिवडी कार्यालयासमोर दहिवडी, गोंदवले, म्हसवडसह तालुक्‍यातील सर्व शाखा डाकघरातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष कॉंम्रेड मिनाताई बडवे, माण तालुका संघटक बी. एन. खुस्पे, पोपटराव कट्टे, बी. एस. बळीप, अमिन आत्तार, शांतीलाल कुंभार, हंबीरराव गायकवाड, दिपाली शेंडे, मिलिंद रणपिसे आदी बहुसंख्य ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)