उंब्रज – पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गवर इंदोली फाट्यानजीक गुरुवारी दुपारी 6 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला.

तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडल्याने महामार्गवर वाहतूक ठप्प झाली होती. गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरला पाठीमागून वाहनाची धडक बसल्याने गॅसगळती होत होती. उंब्रज पोलीस व चालकाने गॅस बंद केल्याने दुर्घटना टळली. दुसऱ्या अपघातात टेम्पो पिकअपला एका टॅंकरने धडक दिल्याने एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. तिसऱ्या अपघातात दोन कार एकमेकाला घासून गेल्या.

अपघाताच्या ठिकाणी त्वरित डीवायएसपी नवनाथ ढवळी,उंब्रज पोलीस स्टेशन पीआय गुंजवटे,रस्ते विकास महामंडळाच्या कर्मचारी पोहचले व अपघाता ठिकाणी असणारी वाहने बाजूला केली व महामार्ग वाहतुकी साठी मोकळा केला अपघात रात्री उशिरा पर्यंत दाखल झाला नव्हता.तसेच अपघाताच्या ठिकाणी त्वरित अग्निशाम दलाची गाडी देखील हजर झाली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)