सातारा: सहकार चळवळ जोमाने सुरु ठेवण्याचा निर्धार

स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या 74 व्या जयंतिनिमीत्त विविध कार्यक्रम

सातारा – स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी सातारा तालुक्‍यात समाजकारण आणि सहकाराच्या माध्यमातून आलौकिक अशी क्रांती घडवली आहे. अजिंक्‍य उद्योग समुहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्‍यातील अनेक गावात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करुन त्यांनी सर्वांना सहकारातून उध्दाराकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरुन वाटचाल करुन कायम शेतकरी हित जोपाण्यासाठी सहकार चळवळ जोमाने सुरु ठेवू, असा निर्धार स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या 74 व्या जयंतिनिमीत्त करण्यात आला.

सातारा तालुक्‍याचे भाग्यविधाते व अजिंक्‍य उद्योग समुहाचे संस्थापक स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमीत्त बुधवारी सकाळी 10.30 वाजता अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पुर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास विविध मान्यवर व असंय कार्यकर्त्यांनी विनम अभिवादन व पुष्पांजली अर्पण केली. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजिव देसाई, कारखाना संचालक मंडळातील सर्व सदस्य, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ वनिता गोरे, सदस्य शिवाजीराव चव्हाण, प्रतीक कदम, सातारा पंचायत समितीचे सभापती मिलींद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, जिल्हा बॅंकेच्या संचालक सौ. कांचन साळुंखे, प्रकाश बडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराज यांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो. या दिवशी एकत्र येवून सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले महान कार्य, त्यांची विचारसरणी, आत्मसन्मानपुर्वक वागणुक, निस्वार्थी व अभ्यासू वृत्ती आदी बाबत चिंतन व मनन करुन त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांची कास धरुन सहकार चळवळ वृध्दींगत करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी अंगीकारलेली विकासकामांची धूरा त्यांचे आचार, विचार व जनसामान्यांच्या प्रेमळ पाठिंब्याच्या जोरावर जोमाने पुढे चालविण्यासाठी आपण सर्वजण कटिबध्द राहू, असे अभिवचन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिले.

स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे सहकारातील योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी सातारा तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्यासह राज्यभरात असंय सहकारी संस्थांच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. केवळ सहकारी संस्था उभारुण चालणार नाही तर, त्यांना पाठबळ दिले पाहिजे, त्या संस्था उभारीस येवून त्याचा फायदा सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या उदात्त हेतूने त्यांनी सहकारमंत्री असताना राज्यभरातील सर्वच सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच राज्यातील सहकार चळवळ आज जोमाने सुरु आहे. यापुढेही ही चळवळ वृध्दींगत होण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांचे पालन करण्याची शपथ उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी घेवून स्व. भाऊसाहेब महाराजांना अभिवादन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)