सातारा: सराईत दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

सातारा – सातारा शहर व परिसरातुन दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांच्या समोर असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील विविध ठिकाणावरून दुचाकी चोरणाऱ्या एकाला 9 दुचाकीसह शुक्रवारी ताब्यात घेतले.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने दिलेली माहिती अशी की सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील व अति.जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार यांनी चोरट्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सागर गवसणे त्यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातुन हिरो होंडा कंपंनीच्या पॅशन प्रो या गाडीवरून फिरणाऱ्या अभिजीत उर्फ राहुल राजाराम लोहार या सराईत चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सातारा शहरातील राजवाडा,जिल्हा रूग्णालय परिसर,बसस्थानक परिसर,कराड या ठिकाणावरून एकुण 9 दुचाकी चोरल्याचे सांगितले.त्याच्याकडे अधिक तपास करत असुन ज्या नागरिकांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा,सातारा पोलिस ठाण्यात येऊन गाड्यांची खात्री करावी असे पोलिसांनी आवाहन केले आहे.या कारवाईत जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील,विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.पद्माकर घनवट,उपनिरीक्षक सागर गवसणे.सहा.फौ.विलास नागे,संजय पवार,ज्योतीराम बर्गे,मोहन नाचण,रविंद्र वाघमारे,योगेश पोळ,नितीन भोसले,संतोष जाधव,राजकुमार ननावरे,प्रवीण कडव,गणेश कचरे,मारूती अडागळे या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)